Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»कर्णधार रोहित शर्मा ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर
    क्रीडा

    कर्णधार रोहित शर्मा ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली ;- जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या कर्णधार रोहित शर्मावर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रोहित विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याच्या मार्गावर उभा आहे.

    अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्यापासून तो फक्त 3 पावले दूर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. गेलने आतापर्यंत 483 सामन्यांमध्ये (तीन्ही फॉरमॅटसह) 553 षटकार मारले आहेत. या यादीत रोहित 551 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध तीन षटकार मारल्यास तो गेलचा विक्रम मोडू शकतो.

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

    ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 553 षटकार
    रोहित शर्मा (भारत) – 551 षटकार
    शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – 476 षटकार
    ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड) – 398 षटकार
    मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – 383 षटकार
    आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

    रोहित शर्मा हा ती-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. रोहितच्या नावावर 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 182 षटकार आहेत. या यादीत किवीचा सलामीवीर मार्टिन गप्टिल 173 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर तर गेल 125 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमावर आता रोहितची नजर आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Cricket Rohit Sharma Rohit Sharma (Captain)
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif