जळगाव ;- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव , जळगाव शहर मनपा व मॉडर्न पेंटयथलॉन असोसिएशन ऑफ जळगाव आयोजित जळगाव जिल्हा व मनपा क्षेत्र शालेय मॉडर्न पेंटयथलॉन क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलाव येथे दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर रोजी संपन्नझाल्या. स्पर्धेचा स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुमेध तळवलकर व जी एच रायसोनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तेजल ओझा यांच्या हस्ते झाला.
निकाल पुढीलप्रमाणे मनपा क्षेत्र विभाग- १७ वर्षाखालील मुले प्रथम धवल आगोने,द्वितीय यश झटके,तृतीय ओम चौधरी,चौथ्या महावीर सिंग १७ वर्षाखालील मुली,प्रथम फाल्गुनी सपकाळे , द्वितीय कुमुदिनी दायमा तृतीय वैजयंती दायमा , १९ वर्षाखालील मुले , प्रथम हर्षल भोस , द्वितीय ललित जाधव , तृतीय करण वंजारी चौथा नील सोनवणे , १९ वर्षाखालील मुली , प्रथम अनुष्का पोतदार , द्वितीय धनश्री पाटील , तृतीय जान्हवी महाजन , जिल्हास्तरीय उर्वरित विभाग १७ वर्षाखालील मुले , प्रथम जय जगताप , द्वितीय क्रींताश सुराणा , सतरा वर्षाखालील मुली , प्रथम कादंबरी चौधरी , १९ वर्षाखालील मुले , प्रथम विमलकीर्ती मेढे , द्वितीय देशराज मुनोत , तृतीय आरुष चौधरी , १९ वर्षाखालील मुली , प्रथम रिद्धी नगरकर