महिलेने पोलीस उपनिरीक्षकाला भरसस्त्यात चपलेने चोपले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गाझियाबादमध्ये एका ई-रिक्षा चालक महिलेने पोलीस उपनिरीक्षकाला भरसस्त्यात मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेने पोलिसांची कॉलर पकडून चप्पलने बेदम चोप दिला आहे. यावेळी रस्त्यावर बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल केल्यावर महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

इंदिरापुर पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ९ येथे असलेल्या कानवानी-पुस्ता रोडवर ही घटना घडली. महिला आणि पोलिसात वाद सुरू असताना अनेकांनी तेथे गर्दी केली होती. त्यातील काहींनी घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आहे. महिला सारखी पोलिसाच्या अंगावर धावून येत होती. मारहाण सुरू असताना “तू येथून निघून जा” असं पोलीस तिला म्हणत आहेत. मात्र ही महिला कोणाचही ऐकण्यास तयार नव्हती.

महिलेने असं का केलं?

इंदिरापुरम क्षेत्राचे वाहतूक निरीक्षक योगेश पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-रिक्षा चालक महिला कानवणी-पुस्ता रस्ता येथे प्रवासी भाडे घेण्यासाठी उभी होती. हा रस्त अरूंद असल्याने तिला रिक्षा दुसरीकडे लावण्यास सांगितले. रस्ता अरुंद असल्याने यावर नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नाही, तसेच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महिलेला असं सांगण्यात अलं होतं. मात्र महिलेन पोलिसाचे म्हणणे न ऐकता ऑन ड्यूटीवर असणाऱ्या पोलिसांवर हात उगारला. भररस्त्यात त्यांना चपलेने मारहाण केली. ही घटना घडत असताना सर्वांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. कोणीही मदतीसाठी किंवा भांडण थांबवण्यासाठी मध्ये पडले नाही. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.