पश्चिम बंगालमधील कुर्मी आंदोलनामुळे नऊ रेल्वे गाड्या रद्द

0

भुसावळ :;- दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये कुर्मी आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून पश्चिम बंगालकडे धावणाऱ्या नऊ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. ऐनवेळी रद्द गाड्यांमुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. रेल्वे प्रशासनाने १९ रोजी सुटणाऱ्या गाड्या ऐनवेळी रद्द केल्या आहेत,

त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या कुर्मी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस, पुणे- हावडा एक्स्प्रेस, मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस, मुंबई- हावडा (१२८०९) व मुंबई- हावडा (१२८५९) यासोबतच एलटीटी- कामाख्या एक्स्प्रेस, एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस तसेच संकरेल सीएसएमटी पार्सल एक्स्प्रेस व मुंबई संकरेल पार्सल एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.