अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, एकाला अटक

0

भुसावळ ;- तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला भुसावळ तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील शिरपूर कान्हाळा रोड परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीला आरोपी रुपेश मंगल पाटील याने 8 फेब्रुवारी 2019 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान पीडित तरुणीला लग्नाच्या आम्हीच दाखवून तिच्याशी प्रेम संबंध ठेवून तिच्या संमतीविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करून तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझ्या घरच्यांना लोकांना त्रास देईल अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला यामुळे कंटाळून तरुणीने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपी रुपेश मंगल पाटील राहणार शिरपूर कन्हाळा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे करीत आहे. दरम्यान आरोपीने पीडित तरुणीला कुरा पानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.