कंडारी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

0

जळगाव :- कुटूंबिय शेतात गेले असतांना मदन नामदेव परदेशी (वय ६२, रा. कंडारी ता. भुसावळ) या वृद्ध शेतकऱ्याने घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात मदन परदेशी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांची गावालगतच शेती असून ते शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे परदेशी यांचे कुटुंबिय शेतात कामासाठी निघून गेल्याने ते घरी एकटेच होते. घरात कोणीही नसतांना मदन परदेशी यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.