जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी हद्दपार

0

जळगाव : जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळीसह एका सराईत गुन्हेगारा विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली. परंतु त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने नशिराबाद येथील टोळीसह कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे एकूण चार जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (वय ४२), टोळी – सदस्य आरिफ शेख तस्लीम खान (वय २४), असलम खान अयाज खान (वय ३०) सर्व रा. कुरेशी मोहल्ला हे टोळीने गुन्हे करीत होते. त्यांच्याविरुद्ध नशिराबाद, एमआयडीसी, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, पहूर, चाळीसगाव शहर, नशिराबाद व चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या -तिघांनी अनेक गुन्हे टोळीने केले असून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

या टोळीसोबत कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमीन हुसेन शेख (रा. उत्राण, ता. एरंडोल) याच्याविरुद्ध चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच यांनी केले.
त्याच्याविरुद्ध दोनवेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरी देखील त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी,आदी. .

 

Leave A Reply

Your email address will not be published.