काँग्रेस, उबाठा आणि शिवसेना सह शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचे आगमन होताच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ‘मोदी गो बॅक’च्या घोषणांनी जारगाव चौफुली हादरले संतप्त शेतकऱ्यांसह काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कांदे सह कपाशी रस्त्यावर फेकली.

शहरातील जारगाव चौफुली वर काँग्रेस (आय) तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उबाठा शिवसेना च्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेचे गुलाबराव पाटील, निळकंठ पाटील, कृष्णा वानखेडे, वंचीत बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष विशाल बागुल यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपा प्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांभीर्याने बघत नाही, कांदा सह कपाशीला भाव नाही, सरकारी खरेदी बंद याच्या निषेधार्थ मोदी गो बॅक च्या घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी “मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी.. नहीं चलेगी… मोदी गो बॅक… मोदी गो बॅक” च्या घोषणांसह शेतकरी, कामगार, ट्रक ड्रायव्हर यांच्या वर अन्याय करणार्‍या भाजपा सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या

रास्ता रोको आंदोलनात आंदोलनकर्ते यांनी कांद्याची माळच गळ्यात घातली होती. रास्ता रोको तब्बल एक तास चालला, यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेचे गुलाबराव पाटील, निळकंठ पाटील, वंचीत बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष विशाल बागुल, ओन्ली ड्रायव्हर संघटने तालुका अध्यक्ष मोहन चौधरी यांच्या सह अरुण पाटील, अॅड अभय पाटील, भरत खंडेलवाल, रवींद्र पाटील, शेख इस्माईल शेख फकीरा, कल्पेश येवले, अरुण तांबे, श्रावण गायकवाड, अजबराव पाटील, योजना पाटील, मनोहर चौधरी, संतोष पाटील, सुषमा भावसार, रिना पाटील, मनिषा पाटील, सविता चौधरी, सोनाली पाटील, कल्पना पाटील, रेखा शिरसाट, मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले अनिता पाटील, आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.