अल्पवयीन युवतीचे अपहरण करून बलात्कार

0

धुळे : शौचालयातून घरी परतणाऱ्या  युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील एका खेड्यात घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील एका खेड्यात राहणारी अल्पवयीन युवती दि. २६ जुलै २०२३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शौचालयातून घरी परतत असताना संशयित अमन शामिल पवार याने तिचे अपहरण केले. तिला गावाबाहेर असलेल्या जंगलातील एका जुन्या झोपडीत नेवून तेथे त्याने युवतीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने तिला त्याच्या घरात बळजबरीने ठेवून घेतले. शिवाय युवतीला शिवीगाळ करून मारहाणही केली. पीडित युवतीचे आई-वडील तिला घेण्यासाठी त्याच्याकडे गेले असता त्यांनाही अमन पवार याने शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी पीडित युवतीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अमन पवार याच्याविरुध्द बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.