“राखी सावंत” आणि तिचा ड्रामा पुन्हा चर्चेत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राखी आपले वैवाहिक आयुष्य असो किंवा इतर काही गोष्टी असो सर्व काही मीडिया समोर व्यक्त करत असते. आता याला तिचा पब्लिसिटी स्टंट म्हणावा कि अजून अजून काही, वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत राहणं हे तिच्या साठी नवीन राहणं तिच्यासाठी नवीन नाही. आता पुन्हा ती मीडिया समोर ढसाढसा रडतांना दिसते आहे. राखी सावंतकडून (Rakhi Sawant) दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. एकीकडे तिचा पती आदिल खान दुर्रानीला (Adil Khan Durrani) पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे पापाराझींसमोर बोलताना राखीने स्वत:च्याच कानाखाली मारून घेतली आहे. ढसढसा रडत ती म्हणाली “मीसुद्धा फ्रिजमध्ये जाणार होती, मात्र वाचले.” राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पापाराझींसमोर बोलताना राखी हमसून हमसून रडू लागली आणि स्वत:च्याच कानाखाली मारू लागली. “मी आदिलवर प्रेम का केलं”, असं ती म्हणाली. राखीने याआधीही फ्रिजचा उल्लेख केला होता. दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरणात तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर जंगलात फेकण्यात आले होते. त्यावरूनच राखी वारंवार हे म्हणताना दिसली की तिचीसुद्धा तीच अवस्था झाली असती.

Leave A Reply

Your email address will not be published.