“सुंबुल तौकीर” ला मिळाली मोठ्ठी ऑफर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुंबुल तौकीर खान (Sumbul Taukeer Khan) हे बिग बॉस १६ (Big Boss 16) च्या घरातलं सर्वात चर्चेत असलेल्या नावांपैकी एक नाव. अस म्हणतात कि बिग बॉस मुळे प्रत्येकाचे नशीब उजळून निघते, तसाच काही सुंबुल तौकीर खान बद्दल झाला आहे. सर्वात अगोदर ती सर्वात कमी वयातली आणि सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक होती. आणि आता चक्क डेली सोप्सची राणी म्हंटली जाणारी ‘एकता कपूरची’ (Ekta Kapoor) ऑफर सुंबुल ला मिळाली आहे.

सुंबुल जेव्हा बिग बॉसच्या घरात पोहोचली होती , तेव्हा एकता कपूरने तिची निवड ‘नागिन 7’(Nagin 7) साठी केली होती. मात्र ती नागिनच्या मालिकेत नव्हे तर खतरों के खिलाडीच्या 13 (Khatron Ke Khiladi 13) व्या सिझनमध्ये दिसणार असल्याचं कळतंय. त्यामुळे सुंबुलच्या हातून एकताच्या मालिकेची ऑफर गेली का, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र ती एकता कपूरच्याच दुसऱ्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एकता कपूर ही सुंबुलच्या अभिनयकौशल्याने प्रभावित झाली असून तिने तिच्या हिट मालिकेची ऑफर दिली आहे. सुंबुल लवकरच ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत मोठा लीप येणार आहे. श्रद्धा आर्या आणि शक्ती अरोडा यांच्या लीपनंतर मालिकेत सुंबुलची एण्ट्री होणार आहे. मात्र याबद्दल अद्याप एकता किंवा सुंबुलने कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.