“केएल राहुल” मुळे माजी खेळाडूंमध्ये वाद !

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

सध्या काही दिवसांपासून केएल राहुल फॉर्मात दिसत नाही आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी आणि वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये केएल राहुलला स्थान देण्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलय. केएल राहुल अजिबात फॉर्ममध्ये नाहीय. मागच्या अनेक महिन्यांपासून तो खूप खराब खेळतोय. मात्र तरीही टीम इंडियात तो आपलं स्थान टिकवून आहे. अन्य खेळाडूंना खराब प्रदर्शनाच कारण देऊन बाहेर बसवलं जातं. मग केएल राहुलला हाच नियम का लागू होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना पडलाय. याच मुद्यावरुन टीम इंडियाच्या दोन माजी खेळाडूंमध्ये फूट पडली आहे.

टि्वटस चर्चेचा विषय बनला

वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी सोशल मीडियावर केएल राहुल विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांचे टि्वटस चर्चेचा विषय बनत आहे. त्याचवेळी आकाश चोपडा (Aakash Chopra)  केएल राहुलच समर्थन करत आहे. आकाश चोपडा आणि वेंकटेश प्रसादमध्ये सुरु झालेल्या या वादाने आता टोक गाठल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.