विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आपल्या अफलातून विनोदी भूमिकांमुळे सर्वांना पोट धरून हसवणारे प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्ली येथील एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, जिम मध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करतेवेळी हृदयविकाराचा झटका आल्यानं ते खाली कोसळले, त्यांना लागलीच एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. आपल्या विनोदाने त्यांनी गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री हा त्यांचा USP आहे. त्याच बरोबर गजोधर भैय्या हे पात्र त्यांचे चांगलेच गाजले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.