नितीश आठ्व्यांदा मुख्यामंत्री; तेजस्वी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री…

0

 

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क;

नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज विक्रमी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांसोबत नवीन “महाआघाडी” म्हणून सरकार स्थापन केले.

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यांचे आमदार ज्यास्त त्यांना अधिक मंत्रीपदे देण्याचं दोन्ही नेत्यांचं ठरलं आहे. त्यानुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला 12 तर तेजस्वी यादव यांच्या पक्षाला 21 मंत्रीपदे मिळणार आहेत. तर डाव्यांना चार मंत्रिपदे मिळणार आहेत. काँग्रेसलाही चांगली खाती दिली जाणार आहे. नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर तेजस्वी यादव यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद आणि अर्थ खातं राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तर काँग्रेसला महसूल खातं दिलं जाणार आहे.

राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या पाया पडल्या. गेल्या 22 वर्षात नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. 2000मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते अवघे सात दिवसच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.