ब्रेकिंग.. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या (Rajiv Gandhi assassination) प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा (Supreme Court) निर्णय दिला आहे.  या प्रकरणी सर्व 6 दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या दोषींवर अन्य कोणताही खटला नसेल तर त्यांची सुटका करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सुप्रीम कोर्टाने निर्णयात म्हटले आहे की, राज्यपालांनी बराच काळ त्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही त्यावर कार्यवाही करत आहोत. या प्रकरणात दोषी ठरलेल्या पेरारिवलनच्या सुटकेचा आदेश उर्वरित दोषींनाही लागू असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते.

राजीव गांधी हत्या प्रकरणात नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार, आणि रॉबर्ट पॉयस यांची सुटका करण्याचे आदोश देण्यात आले आहेत. तर पेरारिवलनची आधीच या प्रकरणातून सुटका करण्यात आली आहे. 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन यांच्या तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती एल नागेश्वर यांच्या खंडपीठाने कलम 142 चा वापर करून हा आदेश दिला.

21 मे 1991 च्या रात्री तामिळनाडूमधील श्रीपेरूंबदूर येथे एका निवडणुक रॅलीदरम्यान धनू नावाच्या महिलेने आत्मघातकी हल्ला केल्याने राजीव गांधींची हत्या झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.