Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र
    महाराष्ट्र

    राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 11, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात सध्या भोंग्यांवरून चांगलेच वातावरण तापले आहे. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे.

    तसेच धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

    आज सकाळी बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण उघड केलं आणि राज ठाकरेंना धमकी मिळाली असल्याची माहिती दिली.

    “मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू,” असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

    “अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असं पत्रात लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

    पुढे बोलताना सांगितलं की, “पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी”.

    “भोंग्याचा विषय धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकांना याचा त्रास होत आहे. सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे,” असं बाळा नांदगावकर म्हणाले.

     

    #maharashtra Bala Nandgaonkar MNS chief Raj Thackeray Raj Thackeray Death Threat State Home Minister Dilip Walse Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif