Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अध्यात्म»मंगळग्रह मंदिरात भाविक, पर्यटकांसह पक्षांचीही राखली जाते उत्तम बडदास्त
    अध्यात्म

    मंगळग्रह मंदिरात भाविक, पर्यटकांसह पक्षांचीही राखली जाते उत्तम बडदास्त

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 11, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमळनेर हे शहर जळगाव जिल्ह्यात अर्थात खान्देशात आहे. खान्देश म्हटला की वर्षभरातून किमान आठ महिने तप्त ऊन…! या तप्त उन्हात भटकंती करण्याची अर्थातच कोणाला इच्छा होत नाही. मात्र ही इच्छा व्हावी इतकेच नव्हे तर मे महिन्याच्या प्रखर उन्हात अमळनेरला हमखास यावेसे वाटावे अशी वातावरण निर्मिती येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिरात करण्यात आली आहे.

    या मंदिरात सर्वत्र फॉगर्स बसविण्यात आले आहेत. त्यातून सतत सूक्ष्म जलबिंदुंचा येणार्‍या भाविक आणि पर्यटकांवर वर्षाव होत असतो. या जलबिंदूमध्ये अतिशय सुगंधी द्रव्य तसेच पंचगव्य मिसळण्यात आले आहे. त्यामुळे सुगंधता, आल्हाददायकता सोबतच शुद्धता व शुचिर्भूततेचीही अनुभूती होते. तसेच भाविकांच्या पायाला चटका लागू नये म्हणून अतिशय उच्च दर्जाचा तापमान रोधक रंग जमिनीवर (फरशीवर) मारण्यात आला आहे. परिणामी मंदिरा बाहेरील तापमानापेक्षा मंदिरातील तापमान किमान १२ डिग्री पेक्षाही कमी होते. हे सारे काही अल्हाददायक, सुगंधी व मनाला आणि आत्म्याला थंडावा तथा विसावा देणारे ठरते.

    श्री मंगळदेव ग्रहाच्या दर्शनाने, अभिषेक व शांतीने मनाची शांती होत असतांनाच अंगाची लाहीलाही थांबून अंगालाही शांती लाभते. परिणामी एकूणच शारीरिक, मानसिक भावनिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक शांततेचा या ठिकाणी सर्वांनाच अनुभव येतो. आजमितीस कदाचित असा प्रयोग करणारे श्री मंगळदेव ग्रह मंदिर हे किमान राज्यातील तरी एकमेव मंदिर असावे.

    पक्षांचीही मांदियाळी

    मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे बाराही महिने पक्ष्यांसाठी पाणी आणि खाद्याची सोय करण्यात आली आहे. मंदिरात सर्वत्र पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि सर्व प्रकारचे धान्य व पक्षांना आवडणारी फळझाडे याठिकाणी बाराही महिने नेहमी उपलब्ध आहेत. त्याचा सुपरिणाम म्हणून कोठेही न दिसणारे पक्षी आता या मंदिरात रहिवास करू लागले आहेत. मंदिर परिसरात भरपूर झाडे आहेत. या झाडांवर मंदिर व्यवस्थापनाने मडकी बांधली आहेत. या मडक्‍यांमध्ये हे पक्षी अंडी घालतात आणि प्रजोत्पादन करतात. पक्ष्यांसाठी सर्वत्र सुरक्षितता आहे. पक्षांना कोणीही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवत नाहीत. फळ झाडांना पक्षांव्यतिरिक्त कोणीही हात लावत नाही. त्याचा सुपरिणाम म्हणून आज सहजासहजी कोठेही ऐकायला न मिळणारी पक्षांची अत्यंत सुमधुर किलबिल आता मंदिर परिसरात खास करून सकाळ आणि संध्याकाळी आपणास ऐकावयास मिळते. भाविक तथा पर्यटकांसह आता श्री मंगळदेव ग्रह मंदिर हे पक्ष्यांसाठीही मोठे आकर्षण व विसाव्याचे ठिकाण ठरते आहे.

    पक्षी संरक्षणार्थ केला जातो जनजागर

    पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी मंगळग्रह सेवा संस्था केवळ स्वतःच प्रयत्न करीत नाहीत. तर ते यासंदर्भात सोशल मीडिया तसेच माहिती पुस्तक व डिजिटल बॅनरच्या माध्यमातून सतत व्यापक जनजागरण करीत आहे. त्याचा परिपाक म्हणून अनेक पक्षीप्रेमी, भाविक तथा पर्यटक मंदिर व्यवस्थापनाला येऊन भेटतात. पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन कसे करावे ? याबाबत मार्गदर्शन मागतात. तसेच पक्षांना काय- काय खाऊ घालावे ? कसे खाऊ घालावे ? त्यांना पिण्यासाठी पाणी कोठे व कसे ठेवावे ? पक्षांनी अंडी घालून प्रजोत्पादन करावे म्हणून काय केले पाहिजे ? याचे मार्गदर्शन घेतात. यातून आता पक्षी संवर्धन व संरक्षणा बाबतचा जनजागर हळूहळू वाढू लागला आहे याची प्रचिती येत आहे.

    या पक्ष्यांची आहे मांदियाळी

    दयाळ (चिरक), पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, बुलबुल, सातभाई, कोतवाल, राखी वटवट्या, भारतीय दयाळ, कवडी मैना, वंचक, पांढऱ्या छातीचा खंड्या, सुर्यपक्षी (शिंजीर), भांगपाडी मैना, कोकिळा , कोकिळ, पोपट याशिवाय चिमण्या कावळे आणि असे काही पक्षी आहेत की ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. अशा सर्व प्रकारच्या पक्ष्यांची आता मंदिरावर नियमितपणे मोठी मांदियाळी झाली आहे. त्यामुळे आता अनेक पक्षीप्रेमीही मंदिराला आवर्जून भेट देऊ लागले आहेत.

    #amalner Mangal Graha Mandir Amalner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif