‘या’ रेल्वे दोन दिवस रद्द; काही विलंबाने; पहा यादी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. नाहीतर तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

भुसावळ विभागातून मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या ४ रेल्वे गाड्या येत्या शनिवारी व रविवारी (१३ व १४ ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या. त्यात इगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे त्रिसाप्तहिक गाड्यांचा समावेश आहे. तर अप मार्गावरील ८ व डाऊन मार्गावरील ८ अशा १२ गाड्या विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. म्हणजेच या गाड्या विलंबाने धावतील. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमाॅडलिंगची कामे केली जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

या गाड्या विलंबाने 

रविवार व सोमवार दोन दिवस मुंबईकडून भुसावळकडे येणाऱ्या (डाउन मार्ग) चार गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यात १२६२७ बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस १.१० तास, ११०५५ एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस १.१० मिनिटे, १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २० मिनटे, ११०६१ एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेस २० मिनिटे थांबवण्यात येईल. दरम्यान, अप मार्गावर आठ रेल्वेगाड्यांना थांबा दिला जाणार आहे.

या रद्द गाड्या 

१२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी १४ ऑगस्टला अमरावती, तर १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस १५ ऑगस्टला मुंबई येथून सुटणार नाही. १२१३६ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १३ला नागपूर, तर १२१३५ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १४ ला पुणे येथून सुटणार नाही. १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू १४ व १५ रोजी भुसावळ, तर इगतपुरी-भुसावळ मेमू १५ व १६ आणि १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १४ ऑगस्ट, तर १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५ ला रद्द केली आहे.

परतावा परत मिळणार 

ज्या प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण केले आहे, त्यांना स्थानकावरील तिकिट खिडकी किंवा ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात तिकिटांचा परतावा मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.