बच्चू कडू नाराज ; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काल एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. शिंदे गटाला पाठिंबा देणारे माजी मंत्री आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोललं जातंय. दरम्यान बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

“नाराजी नाही असे नाही, थोडी नाराजी असतेच. पण ती इतकीही नाही की, आपले घर सोडून दुसऱ्या पक्षात निघून जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. अजून पूर्णपणे मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. पूर्ण विस्तार झाला असता आणि संधी मिळाली नसती तर गोष्ट वेगळी असती”, असे बच्चू कडू भेटीनंतर बोलताना म्हणाले.

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज आहे. तर अनेकांची नाराजी असल्याची चर्चा देखील आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं जातंय. तर आमदार बच्चू कडू यांची कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.