जळगावात जुगाराचा डाव उधळला; दोन लाखांच्या मुद्देमालासह ५ जण ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील विवेकानंद नगरात सुरू असलेल्या जुगाराचा डाव सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने उधळून लावला आहे. या कारवाईत २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील विवेकानंद नगरात जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना सोमवारी २५ एप्रिल रोजी दुपारी मिळाली. या गुप्त माहितीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, पोलीस मुख्यालयातील पोका. आकाश शिंपी, आकाश माळी, रविंद्र सुरळकर, जीवन जाधव, राहूल पाटील, चंद्रकांत चिकटे, पोहेकॉ सुहास पाटील, पो.ना. रविंद्र मोतीराया, पोकॉ. निलेश पाटील यांनी दुपारी १ वाजता छापा टाकून जुगाराचा डाव उधळला.

या कारवाईत राजु शावख तडवी (वय ३५, रा. किनगाव ता. यावल), रामकृष्ण साहेबराव सपकाळे (वय ३४, रा. कांचन नगर आसोदा रोड, जळगाव), रमेश श्रावण सोनवणे (वय ४८, रा. बालाजी मंदीराचे मागे जळगाव), चेतन अनिल भालेराव (वय २३, रा. स्वामी विवेकानंद नगर जळगाव) आणि कुणाल महेश कोळंबे (वय २२, रा. स्वामी विवेकानंद नगर जळगाव) यांना ताब्यात घेतले.

या करवाईत ७ हजार ३२० रूपयांची रोकड, जुगाराचे साहित्य, १ लाख ९८ हजार ६०० रूपये किंमतीचे मोबाईल, रिक्षा आणि दुचाकी असा एकुण २ लाख ५ हजार ९२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी मुख्यालय कर्मचारी पो.कॉ. निलेश भगवान राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.