शेवटी रणबीर-आलीयाने दाखवला लेक ‘राहा’चा चेहरा (व्हिडिओ )

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या रणबीर-आलिया मनोरंजन विश्वात चांगलेच चर्चेत आहेत. रणबीर कपूरचा अॅनिमल सिनेमा मोठ्या पडद्यावर चांगलाच गाजला. आणि आलियाचे सुद्धा बरेच चित्रपट हिट झाले.

हे दोघं कपल चर्चेत आले ते म्हणजे त्यांची लेक ‘राहा’ला घेऊन, १ वर्षांची राहा नेमकी कशी असेल? असे अनेक प्रश्न रणबीर आणि आलियाच्या फॅन्सला पडले होते. एक प्रायव्हसी म्हणून या दोघं जणांनी राहाला माध्यमांपासून दूर ठेवले होते. पण आज ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर-आलियाने आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. सध्या तिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

राहा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुपच क्यूट दिसत होती. तिने तिच्या नाजूक हातांनी आई – बाबांचा चेहरा पकडला होता. समोर असलेली मीडिया रणबीर – आलियाच्या लेकीचं कौतुक करत होतं. रणबीर – आलिया सुद्धा सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.