“वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव”- अजित पवार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

महिला सन्मानासाठी आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून हे धोरण जाहीर होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हिवाळी अधिवेशनात दोनवेळा महिला धोरणाचा मसुदा सादर करण्यात आला. मात्र, पहिल्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दादा भुसे आदींनी सुधारणा सुचविल्याने हे धोरण अधिवेशनात जाहीर होऊ शकले नाही. मात्र, दुसऱ्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

मातृशक्तीला सन्मान मिळणार

आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख कायद्याने करणे बंधनकारक होते; पण जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे सक्तीचे नव्हते. मात्र, नव्या महिला धोरणात वडिलांच्या आधी आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असेल. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी हा महिला धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडला. त्या स्वतः कायम आईचे नाव प्रथम आणि नंतर वडील सुनील तटकरे यांचे नाव लावत आल्या आहेत. त्यांच्या मंत्री दालनाची पाटीही ‘आदिती वरदा सुनील तटकरे’ अशी आहे. आता राज्यात या धोरणानंतर अशीच पाटी आणि असेच नाव लिहावे लागेल. ज्यामुळे मातृशक्तीला एक सन्मान मिळणार आहे. मात्र, या धोरणाची राज्य सरकारला काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल.

महत्वाचा निर्णय 

तसेच बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले कि, इथून पुढे मुलगा असो की, मुलगी आधी आईचे नाव, नंतर वडिलांच नाव येणार आहे, असा महत्वाचा निर्णय घेतला. यापुढे अजित अनंतराव पवार असे नाव दिले जायचे मुल जन्माला आल्यानंतर मुलाचे नाव, वडिलांच नाव आणि आडनाव असे असायचे. पण आता नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलगा असो की मुलगी आधी मुलाचे नाव नंतर वडिलांच आणि पुढे आडनाव असणार आहे. शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहे, असे माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

महिलेच्या नावावर फ्लॅट घेतला तर.. 

अजित पवार म्हणाले की,  “जर एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, तर पुरुषाला 6 टक्के कर भरावा लागतो. पण महिलेच्या नावावर फ्लॅट घेतला तर 1 टक्का सवलत आहे. उदा. 50 लाखाचे घर असेल तर 50 हजार रुपये वाचातात. पुढे महिलांनी नवरोबाला घर घेणार असेल तर माझ्या नावावर घे, पैसे वाचतील, मी अर्थमंत्री नात्याने सांगेन.

 

Leave A Reply

Your email address will not be published.