लोकशाही न्यूज नेटवर्क
पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सने १००० हुन अधिक कर्मचाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एका वृत्तानुसार, विविध युनिटमधून कर्मचारी कपात करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी कपात सुरु आहे असे अहवालात म्हंटले जात आहे. देशातील सगळ्यात मोठी डिजिटल कंपनी असलेल्या पेटीएममधून १००० हुन अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. पेटीएमने आपला खर्च कमी करण्यासाठी आणि आपल्या विविध व्ययसायांची पुनर्रचना करण्यासाठी ही टाळेबंदी केली आहे. पेटीएमच्या या टाळेबंदीमुळे त्याच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १०% टक्के कर्मचाऱ्यांना नोकऱ्या सोडाव्या लागत आहे.
भारतीय स्टार्टअपमधील ही सगळ्यात मोठी टाळेबंदी आतापर्यंतची मानली जात आहे. यंदाचे वर्ष हे अनेक स्टार्टअप कंपन्यांसाठी चांगले राहिले नाही. या वर्षी भारतीय स्टार्टअप्सनी पहिल्या तीन महिन्यात २८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे.