कीर्तनकारावर काळाची झडप, टँकरच्या भीषण धडकेत मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

कीर्तनाचा कार्यक्रम आटपून बहिणीकडे जाणाऱ्या कीर्तनकारावर काळाने झडप घातली. शिरसोली ते जळगावदरम्यान सेंट सा शाळेजवळ अज्ञात वाहनाने भीषण धडक दिल्याने कीर्तनकार कैलास प्रकाश कोळी (२२, रा. खर्डी, ता. चोपडा) हे टँकरखाली अडकून त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास कोळी हे कीर्तनकार असून चोपडा तालुक्यातील खर्डी येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. शनिवार २३ डिसेंबर रोजी पाचोरा येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यानंतर ते दुचाकीने चोपडा येथे येत असताना जळगाव शहराजवळ असलेल्या शिरसोली रस्त्यावर रात्री १२.३० वाजता गॅसच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत त्यांचा उजवा पाय कापला गेला.

दरम्यान नागरिकांसह आरोग्यदूत शिवाजी पाटील यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना पहाटे कैलास कोळी यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला. रविवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहीण  असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.