महिलेच्या पर्स मधुन १लाख ३०हजारांचे सोन्याचे दागिणे लंपास…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील बस स्टॅण्ड ते महाराणा प्रताप चौक दरम्यान एका महिलेच्या पर्स मधुन अज्ञात चोरट्याने १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना आज २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:४५ ते १:२० वाजेच्या सुमारास घडली असुन, घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मनिषा प्रशांत पाटील (३३) रा. दाबकी रोड, अकोला या अकोला येथे रेल्वेत नोकरीस आहेत. मनिषा पाटील माहेरी वाडी-शेवाळे ता. पाचोरा येथे चुलत भावाचे लग्न असल्याने पती प्रशांत पाटील व दोन मुलांसह पाचोरा बस स्टॅण्डवर पाचोरा ते धुळे बस मध्ये बसल्या. बस भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर मनिषा पाटील यांनी त्यांच्या जवळ असलेली पर्स बघितली असता पर्सची चैन उघडी दिसली नंतर पर्स बघितल्यावर ७० हजार रुपये किंमतीची साडेतीन तोळ्याची सोन्याची गळ्यातील माळ, ५० हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्याची सोन्याची चैन व १० हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील कर्णफुले अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात येताच सर्वत्र शोधाशोध केली.यादरम्यान दागिणे मिळुन न आल्याने त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद शिंदे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.