अभिनव विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील अभिनव विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.

याप्रसंगी शिक्षिका स्नेहल ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व व फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली, आणि त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेची व आसपासच्या आवाराची साफ सफाई केली. यावेळी वैशाली राठोड, योगिता तळेले, प्रवीण वायकोळे, नीलिमा वारके, उमेश चौधरी, ज्योती इंगळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.