भारतीय क्रिकेटपटू उमेश यादवला पितृशोक…

0

 

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांचं आज निधन वयाच्या 74 व्या वर्षी झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिलक यादव आजारी होते. नागपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांना घरी आणण्यात येणार होतं, मात्र त्यापूर्वीच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

यादव हे मूळ उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते वलनी कोळसा खाणीत निवृत्त कर्मचारी होते. ते नोकरीच्या शोधात नागपुरात आले होते. कोळसा खाणीत नोकरी मिळाल्यानंतर ते नागपूरजवळील खापरखेडी येथे आले, तिलक यादव यांनी देशाला उमेश यादव याच्यासारखा प्रतिभावंत खेळाडू दिला. उमेश यादवशिवाय तिलक यादव यांची दोन मुले आहे आणि एक मुलगी आहे. कमलेश आणि रमेश अशी दुसऱ्या दोन मुलांची नावे आहेत.

उमेशने पोलिस दलात भरती व्हावे असे तिलक यादव यांना वाटत होते. वडिलांच्या इच्छेनुसार उमेश यादवने तसा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या उमेशला रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने भारतीय संघातही पदार्पण केले. विदर्भाच्या संघाच्या खेळाडूने टीम इंडियात स्थान मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. त्याला विदर्भ एक्स्प्रेस म्हणूनही ओळखलं जातं. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या जाणाऱ्या कसोटी माकीलेचा भाग असणारा उमेश यादव वडिलांच्या निधनानंतर नागपूरला परतला आहे. सर्व विधी झाल्यानंतर तो टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.