लाल परीमुळेच लग्नाचा मुहूर्त टळला…

0

 

नांदगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

एसटीच्या बेभरोशी कारभारामुळे एका नवरदेवाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. एसटीच्या लेट लतीफ कारभाराचा जबरदस्त फटका प्रवाशांना बसतो. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, एसटी बस उशीरा आल्यामुळे त्याच्या लग्नाचाच मुहूर्त टळला (Marriage time). नवरदेवची वाट पाहून नवरी दमली.

परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे लग्नाचा मुहूर्त टाळला आहे. नाशिक मधील नांदगावच्या वऱ्हाडी मंडळींना मनस्ताप सोसावा लागला. पर्यायी व्यवस्था न केल्याने तीन तास बस उशिरा निघाली.  राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे नाशिकच्या नांदगाव येथील एका कुटुंबातील मुलाच्या लग्नाचा मुहूर्त टळला. नांदगाव येथील सतीश बिडवे यांचे मुलाचे लग्न संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात  बाबरा येथील तरुणीसह ठरले होते.

बिडवे यांनी लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडींना घेवून जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराची बस प्रासंगिक कराराने बुक केली होती. आगाराने चालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस नांदगाव ऐवजी नस्तनपूर येथे पोहचले. यामुळे बस चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा बस एक तास उशिराने  निघाली. साधारण 50 किलोमीटर अंतर गेल्यावर बस रस्त्यातच बंद पडली. यामुळे वऱ्हाडी संतापले. बस दुरुस्त होणार नाही हे लक्षात आल्यानंतर सुमारे अडीच तासाने पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पर्यायी बस उपलब्ध करुन देण्यात आली. या सगळ्यात लग्नाचा मुहूर्त टळला. लग्नाचा मुहूर्त चुकल्याने बिडवे परिवारासह वऱ्हाडी मंडळीना मनस्ताप सोसावा लागला.

यादरम्यान, तिकडे नवरीकडचे मंडळी देखील मुहूर्त टळून गेला तरी नवरदेव न पोहचल्याने त्रस्त झाली होती. अखेरीस नवरदेव लग्न मंडपात पोहचल्यानंतर नवरीकडचं वऱ्हाड चिंतामुक्त झाले. त्यानंतर लगेच हा लग्न सोहळा उरकण्यात आला. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.