पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळत्या सरणावरचा वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा भयानक प्रकार भोर तालुक्यातील बालवडी गावत घडला. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असताना मृतदेह बाहेर काढून फेकून देण्यात आला आहे. रविवारी रात्री अत्यंविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर नेरे गावातील प्रकाश सदाशिव बढे या संशयित व्यक्तीने स्मशानभूमीमध्ये जात हा प्रकार केला. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना संबधित व्यक्तीला बघितल्यानं ही घटना उघडकिस आली. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत, त्याचं हॉटेल जाळलं.
दरम्यान या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून ही तणाव परिस्थिती नियंत्रणात आणली. या विचित्र घटनेत मृतदेहाच्या झालेल्या हेळसांड झाल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होतेय. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्याचं कामं सुरू आहे.