अभिनेत्रीच्या लैंगिक छळ प्रकरणी निर्माते असित मोदी यांच्या अडचणीत वाढ…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. देशभरात लोकांना खळखळून हसवणाऱ्या या शोचे चाहते आहेत. हा शो रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच हा शो बबिता जी आणि टप्पूच्या एंगेजमेंटमुळे चर्चेत होता. आता हा शो चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल या शोमध्ये मिसेस सोधीची भूमिका साकारत आहे. जेनिफर मिस्त्रीने गेल्या वर्षी ‘तारक मेहता’चे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांनी असित विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता वर्षभरानंतर निकाल आला आहे. रिपोर्ट्सनुसार, जेनिफरने असित विरोधातील केस जिंकली आहे.

जेनिफरने या प्रकरणाबाबत सांगितले

या प्रकरणातील निर्णय जेनिफरच्या बाजूने आला आहे. जेनिफरने असित मोदीवर जे काही आरोप केले आहेत, त्यावर न्यायालयाने तिचे समर्थन केले आहे. यासोबतच न्यायालयाने असितला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. वृत्तानुसार, असितने जेनिफरला 10% व्याजासह संपूर्ण पैसे द्यावे लागतील असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या रकमेव्यतिरिक्त असित जेनिफरला आणखी 5 लाख रुपये देणार आहे. मात्र, कोर्टाच्या निर्णयावर अभिनेत्री खूश नाही. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान जेनिफरने केस जिंकल्याबद्दल सांगितले होते, ‘होय, मी केस जिंकली आहे. या खटल्याचा निर्णय होऊन 40 दिवस उलटले आहेत. पण आत्तापर्यंत प्रॉडक्शन हाऊसने मला पैसे दिलेले नाहीत. सर्वप्रथम म्हणजे हा माझ्या कष्टाने कमावलेला पैसा आहे ज्याची मी पात्र आहे. न्यायासाठी मी न्यायालयात धाव घेतली, पण वर्ष उलटूनही मला माझे पैसे मिळालेले नाहीत. आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. वास्तविक ज्या समितीचा आदेश आहे, त्यांनी मला आदेशाचा तपशील प्रसारमाध्यमांसोबत शेअर करू नका, असे सांगितले, म्हणून मी एका महिन्यापेक्षा जास्त काळ काहीही शेअर केले नाही, पण ते कसे तरी माध्यमात आले आहे, म्हणून मी आता हे मूलभूत तपशील सांगत आहे.

प्रकरणाबद्दल तपशीलवार जाणून घ्या

जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी सांगितले होते की, होळीच्या दिवशी शोचे प्रोड्युसर असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांनी तिला जाणूनबुजून बराच वेळ सेटवर ठेवले होते. यानंतर सर्वांनी सेट सोडल्यानंतर तिघांनी मिळून जेनिफरसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. यानंतर अभिनेत्रीने मुंबईतील पवई पोलीस स्टेशनमध्ये मोदींवर लैंगिक शोषणाचा आरोप करत तिची जबानी नोंदवली होती. तिने सेटवर मानसिक छळ, शाब्दिक लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. मात्र, असित मोदीने अभिनेत्रीचे आरोप फेटाळून लावले होते. अभिनेत्रीच्या या आरोपांवर असित मोदी यांनी बचावात म्हटले होते की, जेनिफर तिच्या कामात अजिबात लक्ष देत नाही. प्रॉडक्शनमधून त्याच्याकडे रोज तक्रारी केल्या जात होत्या. शूटिंगच्या शेवटच्या दिवशीही त्याने सेटवर खूप शिवीगाळ केली.

Leave A Reply

Your email address will not be published.