A. R. Rehman च्या शोपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, उधळला माफियांचा प्लॅन

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यात ए. आर. रेहमानचा (A. R. Rehman) शो होणार आहे. शो होण्याअगोदरच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कार्यक्रमापूर्वीच ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त माफियांनी मोठा प्लॅन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) पुण्यात मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या टोळक्याच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचा तब्बल एक किलो 108 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन जप्त करीत दोघांना अटक केली.

असा आला संशय
पोलीस कर्मचारी मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी हे दोघेजण आपली ड्युटी करत होते. त्यावेळी मध्य प्रदेशातील काही व्यक्ती पुण्यात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खराडी येथे सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एक दुचाकी खराडीकडून पुण्याच्या दिशेने निघाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबविले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यावेळी त्यांच्याकडे दोन कोटी 21 लाख 60 हजार रुपये किंमतीचे व एक किलो 108 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, 31 हजार रुपयांचे 4 मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज जप्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.