तुफान वादळामुळे भिंत पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शहरात दोन, ते तीन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे शहरात नुकसान होत असल्याचे दिसत आहे. कुठे झाडे पडत आहे तर भिंती पडून नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे शिवाजीनगर भागात कानळद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावीर जिनिंग प्रेसची (Mahavir Jinning Press) ३० फूट संरक्षक भिंत कोसळली. सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अद्याप त्या सुरक्षारक्षकाची ओळख पटलेली नाही.

 

शनिवारी सायंकाळी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा शहराला जोरदार तडाखा बसला. पाऊस सुरू असताना शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळ एक सुरक्षारक्षक सायकलसह उभा होता. पावसाच्या तडाख्याने अचानक जिनिंगची भिंत कोसळली. या भिंतीच्या ढिगाराखाली दबून त्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. महावीर जिनिंग प्रेसच्या जुन्या भिंतीवरच नवीन भिंत बांधली आहे. विशेष म्हणजे या भिंतीच्या विटा या नवीन सिमेंटच्या आहेत. त्यामुळे मागे एकदाही भिंत कोसळली होती. आता पुन्हा ही भिंत पूर्णपणे कोसळली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.