राष्ट्रवादीच्या पॅनलचा दणदणीत, एकनाथ खडसे अन् रोहिणी खडसेंनी केला जल्लोष

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

बोदवड (Bodwad) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती साठी झालेल्या निवडणुकी चा निकाल आज लागला, यात राष्ट्रवादी प्रणित पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना धक्का बसला आहे. व बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड व मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यासह भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसराचा समावेश आहे यामुळे तीन तालुक्यांची एकमेव बाजार समिती म्हणून या मार्केट कमिटीचा लौकिक आहे अर्थात याचमुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती गेल्या तीन पंचवार्षिक निवडणूकां पासून माजी मंत्री एकनाथ खडसे (Minister Eknath Khadse) यांचे वर्चस्व राहिलेल्या बाजार समिती ही भाजपकडे (BJP) होती आता ते राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल उभे केले या पॅनलला पहिल्यांदाच महाविकास आघाडी पॅनल संबोधण्यात आले असले तरी काँग्रेसच्या उमेदवारांना यात स्थान मिळाले नाही याचमुळे अर्ज माघारीच्या वेळेस काँग्रेसने नेते वीरेंद्र पाटील आणि जगदीश पाटील यांनी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

दरम्यान राष्ट्रवादीच्या पॅनलला शिवसेना व भाजपच्या पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते. या माध्यमातून माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे विरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील असा सामना देखील रंगला होता निवडणुकीच्या काळात दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. या अनुषंगाने निवडणूक चुरशीची झाली आज सकाळी दहा वाजता या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. यात दोन्ही पॅनल मध्ये चुरस निर्माण होईल अशी अपेक्षा होती तथापि असे झाले नाही तेथे राष्ट्रवादीच्या पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला तर महायुतीच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे या निवडणुकीत नाथाभाऊंच्या सोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील व रोहिणी खडसे (Rohini Khadse) तसेच सर्व सहकाऱ्यांनी तळमळीने काम केले, नाथाभाऊंच्या सहकारातील आधीच असलेल्या ताकदीला राष्ट्रवादीची जोड मिळाल्याने तेथे राष्ट्रवादीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे दरम्यान राष्ट्रवादी पंडित पॅनल चा विजयदुष्टी पणतात आल्याबरोबर समर्थकाने जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला

Leave A Reply

Your email address will not be published.