भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या शेती आणि फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  हा फॉर्महाऊस भाजपचे नेते गणेश बिडकर यांचा असल्याने या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.

दोघेही एकमेकांचे नातेवाईक 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव विशाल गायकवाड असून त्याला शिक्रापुर पोलिसांनी अटक केली आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आईवडील वास्तव्य आणि कामासाठी आहे. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते.

पीडित एकटी असल्याने साधली संधी 

दरम्यान पीडित एकटीच घरी होती. ही संधी साधून आरोपी विशाल गायकवाड याने फॉर्म हाऊसच्या मागच्या मजुर खोल्यांच्या मागे पीडितेवर अत्याचार केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेचे आई-वडील घरी आले असता तिने हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

तृप्ती देसाईंचे आरोप 

सदर फार्महाउस भाजप नेत्याचे असल्याने अनेक आरोप केले जात आहेत.  पुण्यातील भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीची शेती आणि फार्महाऊस असून पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केला आहे. मात्र, या प्रकरणाबद्दल कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण शिक्रापूर पोलिसांनी दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.