‘अनुमोदना’ हे तर पवित्र कार्य – डॉ. पद्मचंद्र मुनी

0

प्रवचन सारांश – ११/०९/२०२२

धर्म ‘अनुमोदना’ ही अत्यंत पवित्र बाब होय. स्वतः तर करावी व इतरांना देखील ही पुण्यदायी अनुमोदना करण्याची प्रेरणा द्यावी असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी रविवारच्या खास प्रवचनात केले.

नरकात जाण्याचे ४ कारणे आगम शास्त्रमध्ये सांगितले आहेत. त्यापैकी मांस खाणे, मद्य पिणे यांचा समावेश असतो. आपले आरोग्य शक्यतो उत्तमच ठेवा.  समजा आरोग्य बिघडलेच तर औषधीमध्ये चरबी, मांस आदीचा उपयोग करतात. असे औषध घेण्या ऐवजी आयुर्वेदाला आपण प्राधान्य दिले पाहिजे. ‘प्रकृति’ आणि ‘विकृती’ या दोहोंचा फरक अत्यंत सोप्या पद्धतीने डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आपल्या रविवारच्या खास प्रवचनातून सांगितला.

जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती आचार्य प्रवर पूज्य पार्श्वचंद्र म.सा. आदिठाणा सात यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात श्रावक – श्राविकांसाठी दैनंदिन प्रवचन असतेच परंतु रविवारी डॉ. पदमचंद्र मुनी यांचे विशेष नैमित्तिक प्रवचन असते  ज्याचा लाभ शेकडो भाविक घेतात.

आपल्या आगमशास्त्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्यावर दुर्दैवाने कुणीही संशोधन केलेले नाही. कॅप्सुलचे  वरचे आवरण कशा पासून बनते हे तुम्हाला माहीत आहे?

आहार आणि आरोग्य यांचा, आरोग्य व विचार यांचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे आपला आहार योग्य असावा. संकट समयी महापुरुषांची आठवण केल्याने आपल्यात ताकद येते. सम्यकत्व भाव आपल्या मनात निर्माण व्हावे. ‘अनुमोदना’ करायची असेल तर धर्माची अनुमोदना करावी. जितके लोक पचखान, प्रत्याखान करतील त्यांना चांदीची अंगठी दान द्या. चांदीची अंगठी देण्याची कुवत नसेल तर तांब्याची अंगठी द्या पण धर्मदान करावे. स्वत: धर्माचरण करा, दुसऱ्यांकडून धर्माचरण करवून घ्या, अनुमोदना ही एक पवित्र बाब आहे. अनुमोदना हे कार्य श्रेष्ठ कार्य आहे.

साधर्मी सेवा खूप छान असते. जळगाव येथील नवयुवकांमध्ये सेवाभाव उत्तम आहे असे कौतुक देखील डॉ. पद‌मचंद्र मुनी यांनी प्रवचनात केले. जीव नव्हे तर वनस्पतीबाबत ही साता ठेवली जाते. रस्ता, इमारती बनत असतील तर ते झाड न कापता, ते झाड आहे तिथेच ठेवले जाते. रस्ता वळवला जातो, झाड सुरक्षित ठेवत इमारत बांधली जाते ते क्षेत्र म्हणजे जैन हिल्स ! आचार्य श्री जयमलजी महाराजांची 315 वी जयंती जैन हिल्स येथे साजरी झाली. ‘न भुतो न भविष्यती’ इतका यशस्वी समारोह झाला.. ही खरी ‘अनुमोदना सेवा’ म्हणता येईल. भोजन व्यवस्था, शिस्त सगळ्या गोष्टी खूपच चांगल्या ठरल्या. माझ्या 34 वर्षांच्या दीक्षा काळात महापुरुष जयमलजी महाराजांची जयंती इतक्या उत्तम पद्धतीने साजरी होणे हे जळगावकर व अशोकभाऊ यांचे यश म्हणावे लागेल. असे डॉ.  पदमचंद्र मुनी  यांनी आवर्जून प्रवचनात सांगितले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.