तांदुळवाडी येथील मायलेकी बेपत्ता

0

कजगाव ता.भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील रहिवासी असलेली महिला आपल्या मुलीसह नाश्ता करण्यासाठी गेल्या असताना चाळीसगाव शहरातून बेपत्ता झाल्या.

तांदुळवाडी येथील आदर्श शेतकरी व पूजा किराण्याचे मालक भागवत मधुकर पाटील यांच्या पत्नी रुपाली (वय ३२) या कन्या रितिकाला (वय १०) सोबत घेवून दि. ८ सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे थायरॉईडच्या टेस्टसाठी चाळीसगाव येथील शैलेश हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये जाताच त्यांनी नाव नोंदणी केली. नोंदणी क्र. ८० असल्याने मुलीला नाश्ता व पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्या, त्या वेळेत आई व मुलगी बेपत्ता झाल्या.

त्यांचा फोन बंद येत असल्याने भागवत पाटील हे तांदुळवाडी फाट्याजवळ दुपारी ३ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत पत्नी व मुलीची वाट पाहत बसले. नातेवाईकांना देखील फोन करून त्यांनी विचारपूस केली. पण मायलेकी आढळून आल्या नाहीत. जवळचे नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांनी शोध घेणे चालू ठेवले. तीन दिवस झाल्याने त्यांचा तपास लागत नसल्याने सर्व हैराण झाले आहेत. पोलीसात तक्रारीची माहिती मिळू शकली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.