गणेश विसर्जनावेळी तिघांचा बुडून मृत्यू

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर शहरात गणेश विसर्जनाला गालबोट लागलं आहे.  शहरातील बोदवड पुलाखाली कांग नदी पात्रात भाविकांकडून गणेश विसर्जन सुरू  गणेशवाडी भागातील रहिवासी किशोर राजु माळी (वय २७) यास एक लहान मुलगा हा पाण्यात बुडतांना दिसला. दरम्यान किशोर याने क्षणाचा विलंब न करता पाण्यात उडी मारून लहान मुलाला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. व त्याने लहान मुलास वाचविले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने किशोर हा पाण्यात बुडाला. पोहणाऱ्या मुलांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यास वाचविणे निरर्थक ठरले. सुमारे दोन तासानंतर किशोर यास मयत परीस्थितीत बाहेर काढण्यात आले. किशोर यांच्या पश्चात आई, वडील, लहान, भाऊ तसेच पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील माळपिंप्री येथील पाझर तलावात किशोर आत्माराम पाटील (वय ३२) व नरेश संजय गावंडे (वय २४) या दोन तरुणांचा श्री विसर्जन करीत असताना बुडून मृत्यू झाल्याची सलग दुसरी घटना घडली. ही घटना घडल्याने माळपिंप्री गावावर शोककळा पसरली. जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथे काही भाविकांकडुन गणेश विसर्जन केले जात होते. परंतू पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने विसर्जन करतांना सुमारे सहा जण बुडाले. यावेळी प्रचंड आरडाओरडा केल्याने आजुबाजुच्या स्थानिक रहिवाशांनी  व मच्छीमारांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु सहा पैकी चार जणांना वाचविण्यात यश आले.

मात्र किशोर आत्माराम पाटील व नरेश संजय गावंडे या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनांमुळे शहरात तसेच माळपिंप्री येथे हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.