धक्कादायक.. भीक मागण्यासाठी मुलांची चोरी; महिला जेरबंद

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

भीक मागायला लावण्यासाठी लहान मुलांची चोरी करणाऱ्या महिलेल्या अखेर अटक करण्यात आलीय. सदर महिला ही दिल्लीची (Delhi) असून दादर रेल्वे स्थानकातून (Dadar Railway Station) आरोपी महिलेला अटक करण्यात आली. या महिलेच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

8 सप्टेंबरला बोरीवलीतून (Borivali) एका बाळाची चोरी झालेली. बाळाचं अपहरण झाल्याप्रकरणाची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. तीन वर्षांचं बाळ रेल्वे स्टेशन परिसरातून गायब झाल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. अखेर दादर रेल्वे स्थानकातून महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय.

अटक करण्यात आलेली आरोपी महिला तीन दिवसांपूर्वी मुंबईत आली होती. आरोपी महिला मूळची दिल्लीत राहणारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बोरीवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आपल्या अल्पवयीन मुली आणि मुलासह मुंबईत आली होती.

लहान मुलामुळे भीक मिळेल, या हेतूने तिने 3 वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं होतं. या मुलाच्या मदतीने भीक मागण्याचा तिला प्लान होता. मुंबईतून ही आरोपी महिला चोरी केलेल्या मुलाला घेऊन दिल्लीला जाणार होती. पण त्याआधीच पोलिसांनी या आरोपी महिलेला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

एका सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना या महिलेचा तपास लागला. दादर रेल्वे स्थानकात आरोपी महिला हरवलेल्या मुलासोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. तर त्याआधी तीन वर्षांच्या मुलाला उचलून धावत जात असतानाचंही एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. या दोन्ही सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी महिलेचा शोध घेण्यात आला. अखेर पोलिसांनी हरवलेल्या बाळाचीही सुटका केली. तसंच आरोपी महिलेच्याही मुसक्या आवळल्या. आरोपी महिलेला एका 17 वर्षांचा मुलगा आणि एक 10 वर्षांची मुलगी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.