मोठी बातमी; पुण्यातील साळुंखे विहारच्या एमएनजीएल पाइपलाइनला भीषण आग

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

साळुंखे विहार रस्त्यावरील नाला पार्कजवळ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची पाइपलाईन लीक झाल्यानं पेट घेतला होता. संभाव्य धोका टाळण्यासाठी गॅस पुरवठा सध्या बंद करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण वानवडी परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाचे जावं घटनास्थळी पोहचले असून अद्याप आग नियंत्रणात आलेली नाही. आगीत साळुंखे विहार मधील एमएनजीएल पाइपलाइनला लागलेल्या आगीत एक कर जाऊन खाक झाली आहे. आग झपाट्याने पसरल्याने रहिवाशांमध्ये आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.