संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 673 वा संजीवन समाधी पालखी सोहळ्याचे आयोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था व सहयोगी शाखा युवक, महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जुलै शनिवार रोजी वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 673 वा संजीवन समाधी पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार, असून मिरवणूक सकाळी ८:३० वाजता भव्य पालखी सोहळ्याची सुरुवात श्रीमती मनोराबाई जगताप सामाजिक सांस्कृतिक सभागृह पांझरा पोळ टाकी येथून सुरु होऊन ती पुढे तेली चौक मार्गे राम मंदिर, सराफ बाजार, सुभाष चौक राजकमल टाकी मार्गे श्री गुरुद्वारा साहेब येथे सकाळी १०:३० वाजता शीख बांधवांच्या वतीने पालखीचे व समाज बांधवांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. पुढे पालखी टिक ११:३० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह ( लेवा भवन) टेलिफोन ऑफिस च्या जवळ आंबेडकर मार्केट समोर येथे समारोप होईल.

या ठिकाणी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला असून, तरी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे व शिवणकाम करणाऱ्या टेलर्स बांधवांनी आपला व्यवसाय अर्धा दिवस बंद ठेवून कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आव्हान समाज अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, विवेक जगताप, अनिल खैरनार, दीपक जगताप, चेतन खैरनार, मुकुंद मेटकर, मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, सतीश जगताप, सुरेश सोनवणे, सतीश पवार, राजेंद्र बाविस्कर, प्रदीप शिंपी, अरुण मेटकर, दत्तू मामा वारुळे, युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, सचिव हेमंत शिंपी, महिला अध्यक्ष रेखाताई निकुंभ, सचिव माधुरी मेटकर, शाखा अध्यक्ष रत्नाकर बाविस्कर, गणेश सोनवणे, अशोक सोनवणे दिगंबर मेटकर, किरण सोनवणे नितीन सोनवणे, सुधाकर कपूर, तसेच निमंत्रित सदस्य युवक कार्यकर्ते महिला मंडळ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.