सहा दुचाकींसह दोन संशयित ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई

0

जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या असून जळगाव शहर पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीनांकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय अधिकारी संदिप गावित जळगांव भाग जळगाव. यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सुचना केल्या होत्या. त्यानुसार पथक तयार करण्यात आले होते. पथकातीलसूत्रणा मिळालेल्या गुप्त माहिती नुसार दि.१४ रोजी रात्री १२.३० संशयित चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार सपोनि किशोर पवार, पोकों.तेजस मराठे, पोना.किशोर निकुंभ,आदींनी रात्री १.०० वा. सु. एस.एम. आयटी कॉलेज परीसरात सापळा लावून दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार सफौ बशिर तडवी, पोहेकॉ.विजय निकुंभ पोहेकॉ . उमेश भांडारकर, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोना.प्रफुल्ल धांडे, पोना.किशोर निकुंभ पोना .गजानन गुजर पोना.योगेश पाटील, पोना .राजकुमार चव्हाण, पोकों.रतन गिते, पोकों.तेजस मराठे, पोका .योगेश इंधाटे, पोकों.अमोल ठाकुर यांनी केली .
दरम्यान दोघांची विचारपुस करता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असुन ६ मो.सा. जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी . जिल्हापेठ पो.स्टे चे २ गुन्हे व शहर पो.स्टे. येथे २ गुन्हे असे एकूण ४ गुन्हे उघड झाले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोना.किशोर निकुंभ हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.