महिलेचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला पब्लिकने ‘ धुतले ‘ !

0

जळगाव:- शहरातील चित्रा चौकापुढे कोंबडी बाजार चौक परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ काढून, छेडखानी करणाऱ्या एका टवाळ खोराला महिलेसह नागरिकांनी चांगलाच धुतल्याची घटना 19 रोजी गुरुवारी घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,

कोंबडी बाजार भागातील खंडवा कटलरी या दुकानात आरीफ खाटीक (वय – ३१) हा तरुण कामाला असून गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून एक महिला आपल्या मैत्रिणीसोबत जात असताना, आरीफ खाटीक याने व्हिडीओ केला असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तरुणाने व्हिडीओ केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने संबधित तरुणाला विचारणा केली. त्या तरुणानेतरुणाला विचारणा केली. त्या तरुणाने व्हिडीओ करत नसल्याचे सांगितले.
मात्र, फोन तपासला असताना, डीलीट केलेल्या फंक्शनमध्ये हा व्हिडीओ आढळून आला. त्यानंतर त्या तरुणाने महिलेशी अरेरावी केली. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलेच बदडून काढले.. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.