मास्टर कॉलनीतून बकरी चोरणाऱ्या दोन भामट्यांच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव :- शहरातील मेहरूण भागातील मास्टर कॉलनी भागातून बकऱ्या चोरीचे प्रमाण वाढते होते. याबाबत एमआयडीसी पोलिसांना बकरी चोरणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की,मास्टर कॉलनी येथील उमर मस्जिद येतुन दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता आसिफ आरिफ कुरेशी यांची तीन वर्षे वयाची सुरती जातीची बकरी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरी करून नेली होती. याच परिसरातून यापूर्वीही काही बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. त्यानुसार तपास सुरु होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, सदरचा गुन्हा हा खलील खान मुशीर खान (वय ४७), मुसा खान रशीद खान (वय ६२, दोघे रा. खडका रोड, भुसावळ यांनी केली असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले.सदरचा गुन्हा केल्याचे त्यांनीही कबूल केले होते. म्हणून त्यांना बुधवारीच रात्री अटक करण्यात आली होती. गुरुवारी त्यांना न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सरकारतर्फे एड. निखिल कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, किशोर पाटील, निलोफर सय्यद, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, योगेश बारी, राहुल रगडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे अशांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.