Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»देशाला नवे राष्ट्रपती मिळणार; 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान
    राजकारण

    देशाला नवे राष्ट्रपती मिळणार; 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 9, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  

    देशात राष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली आहे.  देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहे. 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. कारण देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे.

    18 जुलैला यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि 15 व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून याच निवडणुक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्च पदी निवड होत आहे.

    17 जुलै 2017 रोजी अखेरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रपती निवडण्यासाठी सामान्य लोक मतदान करत नाहीत. तर त्यासाठी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे सदस्य लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतील. नव्याने राष्ट्रपदी होण्यासाठी काही नावंही चर्चेत आहेत.

    असा असेल निवडणूक कार्यक्रम

    15 जून अधिसूचना जारी होणार

    29 जून उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख

    2 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार

    18 जुलै, मतदान होणार

    21 जुलै, निकाल लागणार

    24 जुलैपर्यंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ

    मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग मतदारांना पेन देणार

    5,43200 इतके यंदाच्या मतांचे मूल्य

    4809 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    776 खासदार, 4033 आमदार मतदान करणार

    संसद आणि विधानसभांमध्ये पार पडणार मतदान प्रक्रिया

    10 दिवस आधी सूचना केल्यावर हव्या त्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार

    राजकीय पक्षांना मतदारांना व्हीप लागू करता येणार नाही

    राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेली नावं

    माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन

    उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल

    छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके

    तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन

    झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू

     

    Election Commission of India President of India election Presidential Election 2022 ramnath kovind
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026

    गोंधळ करणाऱ्यांना हटकल्याने संगीतकाराची हत्या

    September 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif