डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार व कौतुक सोहळा संपन्न झाला.

महाविद्यालयाचा एकूण निकाल 94.09 % एवढा लागला. कला शाखेचा निकाल 85.71%, वाणिज्य शाखेचा 96.57% व विज्ञान शाखेचा 99.41% तर HSCVC विभागातील MLT शाखेचा 100%, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी 96.30% तर अकाउंट अँड मॅनेजमेंट शाखेचा 90% याप्रमाणे निकाल लागला आहे.

याप्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (HSCVC) शाखेतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींचा प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गौरी राणे मॅडम होत्या. कला शाखेच्या प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शुभांगी बैजू भावसार व दीपिका ललित सोनार, वाणिज्य शाखेच्या वैष्णवी जयदेव  चौक व लोचना हेमराज कोल्हे, विज्ञान शाखेच्या मानसी रवींद्र घुगे व रोहिणी गजानन  जुनघरे,  Hscvc शाखेच्या  इलेक्ट्रॉनिक व टेकनोलॉजि विभागात समृध्दी प्रकाश  फुसे व नेहा भरत शिंदे,  MLT विभागात साक्षी प्रमोद जोशी व मानसी सुनील प्रजापत,

A/C and OM विभागात सुजाता शांताराम साळुंखे व  प्रज्ञा सुनील सपकाळे यांचा प्राचार्य गौरी राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थिनींनी आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावे. त्यात सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करावा. आयुष्यात एक तरी छंद जोपासावा असा मोलाचा सल्ला प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिला बारावी नंतरच्या करियरच्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निकालवाचन उपप्राचार्य सुनीता पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रा.एन जी बावस्कर व  प्रा.के सी वंजारी तसेच प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बेलसरे सरांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.