तरूणीला इन्स्ट्राग्रामवर पाठविले अश्लिल मॅसेज

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

इन्स्ट्राग्रामवर एका तरुणीला अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळमधील २८ तरुणी एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तिला ५ जून ते ८ जून दरम्यान अनोळखी व्यक्तीने कारण नसतांना इन्टाग्रामवर अश्लिल मेसेज पाठविले. अशा पध्दतीने वारंवार अश्लिल मेसेज पाठवून अनोळखी व्यक्ती त्रास देत असल्याने तरुणीने बुधवारी याबाबत सायबर पोलिसात तक्रार दिली.

त्यावरुन अश्लिल मेसेज पाठविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.