नवरा-बायकोसह कुटुंबीयांची हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कौटुंबिक वादामुळे नवरा-बायकोसह त्यांच्या नातेवाईकांनी एकमेकांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कृष्णवर्धन राजेंद्र पाटील व त्यांची पत्नी हर्षा कृष्णवर्धन पाटील यांच्या गेल्या काही महिन्यांपासून वाद असल्यामुळे ते विभक्त राहत आहे. दरम्यान हर्षा पाटील या मुंबईला राहायला आहे. त्यांनी खावटीसाठी बी.जे. मार्केट येथील कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान, मंगळवार ७ जून रोजी त्यांची कौटुंबिक वादाची तारीख असल्याने पती-पत्नीसह दोघांचे नातेवाईक बी.जे. मार्केट येथे आले होते.  दुपारी ४ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना कुष्णवर्धन पाटील आणि पत्नी हर्षा पाटील यांच्यात वाद झाला. यात दोन्ही कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी ८ जून रोजी रात्री परस्पर विरोधात कृष्णवर्धन राजेंद्र पाटील, सुनिता राजेंद्र सोनवणे, दोन्ही रा. गुजराल पेट्रोल पंप, कृष्णवर्धन पाटील यांचा मित्र (नाव गाव माहित नाही), हर्षा कृष्णवर्धन पाटील , गुलाब गोरख पाटील दोन्ही रा. गणराज कॉलनी, मुंबई यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.