आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच काही निवडक निमंत्रकांची उपस्थिती होती.

गेल्या वर्षी 8 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या दरबार हॉलचे उद्घाटन निश्चित झाले होते. मात्र तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता.

राजभवनातील दरबार हॉलचे लोकार्पण केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद संबोधिक करत होते. राष्ट्रपतींकडून मराठीतून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. ते म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध राहिला आहे, असं सांगतानाच महाराष्ट्राचा अर्थ सांगायचा झाला तर भाषा विज्ञानाकडे जायची गरज नाही. तुमचे हृदयच महाराष्ट्राचा अर्थ सांगेल.

आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. अर्थातत भारताचं महान राज्य आणि क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील केवळ महापुरुषांची नावे घेतली तरी यादी कमी पडेल. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेशवर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवार आदी अनेक महापुरुष महाराष्ट्राने दिले. विचारधारा वेगळी असेल पण मानवजाताची उत्कर्ष करणे हाच सर्वांचा उद्देश राहिला आहे. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, अन्यायाविरोधात लढणाऱ्या वीरांची धरती आहे.

गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं गाणं कायम स्मरणात

यावेळी रामनाथ कोविंद यांनी लता मंगेशकर यांचं देखिल स्मरण केलं. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यावर मला थोडी सुन्नता जाणवतेय. आठवड्याभरापूर्वी आपण लतादीदींना गमावलं. त्यांचं संगीत अजरामर आहे. त्यांचं संगीत आणि स्वभाव कायम स्मरणात राहील. मला त्यांचा स्नेह लाभला. त्यांचं जाणं दुर्देवी आहे.

राजभवन हे लोककल्याणचं केंद्र

राजभवन भारताचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण पाहतो. राजभवन हे लोककल्याणचं केंद्र ठरेल. दरबार हा शब्द राजेशाहीशी संबंधित आहे. नव्या महाराष्ट्राच्या जीवंत लोकशाहीचं हे प्रतिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.