२२ वर्षीय गरोदर विवाहितेची आत्महत्या; पोटातील बाळ ही दगावले…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मनवेल येथील २२ वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. यामध्ये तिच्या पोटातील बाळ देखील दगावले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनवेल ता. यावल येथील रहिवाशी शितल उर्फ रूपाली विजय कोळी २२ वर्षीय गरोदर महिला आपल्या घरी होती. दरम्यान घरात तिने छताच्या आडव्या लोखंडी एंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तीला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. सदर महिला गरोदर होती तिच्या पोटात पुरुष जातीचे अर्भक होते, ते देखील यात दगावले आहे. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.