अनेक राज्यात पावसाच्या सरी, पुढील ३ तास महत्वाचे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात आज सकाळपासून अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडी ऐवजी मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे भात शेतीच नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. सकाळपासून उन्हाचे दडी मारल्याने रायगडमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं होत. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव, पाली परिसराला पावसाने झोडपले आहे. शेतात कापून ठेवलेले भाता पिक पावसाच्या पाण्यात बुडून गेलेय.

या वर्षी उशिरा सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. मात्र पाऊस जरी उशिरा सुरु झाला असला तरी प्रमाणात प्रमाणात पडल्याने भातशेतीची पिके चांगली आली होती. परुंतु आज दुपारी अचानक सुरु झालेल्या पावसाने पोलादपुर, महाड, माणगाव, म्हसळा, रोहा, सुधागड तालुक्यांना चांगलेच झोडपले आहे.

अचानक आलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सर्वात मोठा फटका येथील शेतकऱ्याला बसला आहे. भाताचे पीक तयार झाले असून, अनेक ठकाणी कापलेले भाताचे पीक शेतात वळवण्यासाठी ठेवलेले आहे. अचानक आलेय या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.